metro recruitment

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात वर्ग क आणि ड पदांच्या ८६५ जागा – MIDC Recruitment 2019

Maharashtra Audyogik Mahamandal bharti 2019 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ८६५ जागा

Maharashtra Audhyogik Mahamandal Has Published an notification for the recruitment of 855 posts please  read all information carefully and apply  for it.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तत्सम अर्हता धारण केली असावी.

कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा तत्सम अर्हता धारण केली असावी.

लघुलेखक (निम्न श्रेणी) पदाच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मराठी लघुटंकलेखक १०० प्र.श.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० प्र.श.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावा.

वरिष्ठ लेखापाल पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

सहाय्यक पदाच्या ३१ जागा 
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा आणि दोन वर्षात MS-CIT उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

लिपिक टंकलेखक पदाच्या २११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा आणि मराठी ३० प्र.श.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० प्र.श.मि. वेगाची परीक्षा आणि MS-CIT उत्तीर्ण असावा.

भूमापक पदाच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वाहनचालक पदाच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता सातवी उत्तीर्णसह हलके अथवा जड वाहन चालविण्याचा परवाना आणि २ वर्षाचा अनुभव धारक असावा.

तांत्रिक सहाय्यक पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभ्यासक्रम अथवा स्थापत्य/ अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्याक्रम परीक्षा उत्तीर्ण असावा.

जोडारी पदाच्या ४१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारक असावा.

पंपचालक पदाच्या ७९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारक असावा.

विजतंत्री पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे प्रमाण धारक असावा.

शिपाई पदाच्या ५६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता ४ थी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे.

मदतनीस पदाच्या २७८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता ४ थी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

फीस –  खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०१९ (रात्री ११:५९ पर्यंत आहे.)

1 thought on “महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात वर्ग क आणि ड पदांच्या ८६५ जागा – MIDC Recruitment 2019”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *